आयुष्यात त्वचा रोग होणार नाही –  करून बघा हा उपाय

त्वचा रोग

त्वचा रोग || त्वचा रोग व उपचार || तुरटी चे फायदे ||

काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करू नका, पुढे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सतत 8 दिवस अंघोळ केली, तर तुम्हाला आयुष्यात चर्मरोग होणार नाही.

त्वचा रोग

त्वचेला खाज सुटण्यासारखे प्रकार.

अनेक वेळा शरीरावर लहानसहान बॅक्टेरिया असतात, त्यामुळे त्वचेला खाज सुटण्यासारखे प्रकार होतात, ते देखील बंद होतील.

10 रूपया एक आंघोळ

तुरटी जी सहज किराणा दुकानावर उपलब्ध होते, 10 रूपयाला 50 किंवा 100 ग्रॅम असा तुरटीचा भाव आहे. एका प्लास्टीकच्या बाटलीत तुरटीचे लहान-लहान तुकडे करून टाका, पाणी टाका. यानंतर तुरटीचे द्रावण तयार होईल.

अशा ठिकाणी जास्त लावा

हे द्रावण अंगाला अशा ठिकाणी लावा, ज्या ठिकाणी घाम जमा होणे, अथवा खाज सुटण्याची शक्यता अधिक असते, जसे डोके, काखेत आणि मांड्यांच्या मध्ये. काखेत तुरटीचे द्रावण लावल्याने दुर्गंधी जाण्यासही मदत होते.

वस्तू एक, उपाय अनेक

तुरटीचे हे द्रावण लावल्यानंतर पाच मिनिटात सुकते, सुकल्यानंतर पांढरे स्फटीक स्पष्ट दिसतात, यानंतर अंघोळ करा, अशी आंघोळ सतत 8 दिवस आणि वर्षभरात 4 वेळा केल्यास, तुम्हाला गजकर्ण, नायटा यासारखे आजार अजिबात होणार नाहीत. शिवाय शरीराची दुर्गंधी येणार नाही, केसांत चाई देखील होणार नाही.

थोडीशी काळजी ही आवश्यक

आंघोळ करताना तुरटीचे पाणी डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या, हे पाणी डोळ्यात गेल्यास अधिक जळजळ होते. यासाठी डोके धुतांना डोळे घट्ट मिटा.

इतर आरोग्या विषयी माहिती पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top