कान दुखणे कारण – Ear pain – कान दुखणे घरगुती उपाय

कान दुखणे

कान दुखणे हा त्रास सर्वानाच कधीनाकधी होत असतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक कारणांमुळे कान दुखत असतात. यामध्ये प्रामुख्याने कानात झालेल्या इन्फेक्शनमुळे कान दुखत असतात. याशिवाय सर्दी झाल्यामुळे तसेच कानात मळ अधिक झाल्यानेही कान दुखू लागतो. याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय तसेच औषध उपचारांची माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे.

कान दुखण्याचा त्रास कारण – Ear pain

  • कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे,
  • सर्दी झाल्याने सायनस इंन्फेकशनमुळे,
  • हिरड्या सुजल्यामुळे,
  • कानात मळ अधिक झाल्याने,
  • कानाचा पडदा फाटल्यामुळे,
  • कानात काडी अथवा टोकदार वस्तू घालून जखम झाल्यामुळे,
  • कानात इंज्यूरी किंवा मार लागल्याने कान दुखत असतो.

वरीलपैकी कारणे ही कान दुखण्याचा त्रास साठी कारणीभूत ठरू शकतात.

कान दुखणे यावरील घरगुती उपाय

लसूण

दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक करून मोहरीच्या तेलात गरम कराव्यात. थंड झाल्यावर तेल गाळून घ्यावे. ह्या तेलाचे 2-3 ड्रॉप्स दुखणाऱ्या कानात घालावे. यामुळे कान दुखणे थांबण्यास मदत होईल. याशिवाय आपण लसूण रसाचे काही थेंबही दुखणाऱ्या कानात घालू शकता.

कांदा

कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण असतात. कांदा थोडा गरम करून त्याचा चमचाभर रस काढावा. या रसाचे 2 ते 3 ड्रॉप्स कानात दिवसातून 3 वेळा घातल्यास कान दुखण्याचा त्रास कमी होते.

आले

कांदा आणि लसूण प्रमाणेच आलेही यावर उपयोगी ठरते. आल्याच्या रसाचे 2 ते 3 ड्रॉप्स कानात दिवसातून 3 वेळा घातल्यास कान दुखण्याचा त्रास दूर होते. हा आयुर्वेदिक उपाय कान दुखणे यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण आल्यामध्ये वेदना व सूज कमी करणारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात.

तुळशीची पाने

तुळशीच्या पानांचा रस काढून त्याचे काही थेंब दिवसातून 2 वेळा कानात टाकावे. हा घरगुती उपाय केल्यामुळेही कान दुखण्याचा त्रास थांबते.

आरोग्य संदर्भात अशीच अशीच खात्रीशीर माहिती पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top