कंबर दुखी ने त्रस्त आहात?

कंबर दुखी

शहरी लोकांच्या रोजच्या अति शीघ्र जीवनशैलीमुळे त्यामना व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. रोजची दगदग, धावपळ, उठबस म्हंणजे व्यायाम नव्हे. व्यायाम न करण्याचे परिणाम म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार हे केवळ वाढत्या वयातच होणारे आजार न राहता ते तरुण आणि अगदी लहान वयातही होणे.

मणक्यांमध्ये नैसगिकत: चार वेगवेगळे बाक असतात. मानेला पुढच्या दिशेने (सर्व्हायकल स्पाईन), पाठीला मागच्या दिशेने (थोरॅसिक स्पाईन), कंबरेला पुढच्या दिशेने आणि माकडहाडाला मागच्या दिशेने बाकाला लंबर असे म्हणतात. मणक्यांच्या मधून मज्जारज्जू जात करत असल्याने मणक्यांना इजा झाल्यास मज्जारज्जूवर परिणाम होऊन ‘कंबरदुखी/पाठीचे दुखणे/मणक्याचे आजार सुरू होतात .

कंबर दुखी – मणक्याचा आजार होण्याची कारणे

  • लहान वयात खूप जास्त वजनदार दप्तराचे पाठीवर घेतलेले ओझे,
  • खुर्चीत जास्तीत जास्त वेळ बसणे, किंवा बसण्याची मुद्रास्थिती चुकीची असणे,
  • संगणकावर सतत काम करणे,
  • कोणत्याही वाहनातून प्रवास करताना खाच-खळगे, खड्ड्यांमुळे मणक्याला मार बसणे,
  • नेहमी पोट साफ न होणे,
  • रात्री जागरण होणे,
  • चिंता, शोक, क्रोध,
  • व्यायमाचा अभाव,
  • स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा, इ.मुळे पाठीचा मणका गॅप किंवा कंबरदुखी उद्भवते.

कंबर दुखी – मणक्याच्या आजारांची लक्षणे

अस्थिक्षय किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाठीचा मणका कमजोर होणे,

हाता-पायामध्ये मुंग्या येणे, कंप येणे,अवयव बधीर होणे, त्यांच्यात कळा येणे,

कंबरेत दुखणे,सकाळी उठताना त्रास होणे,

कुशीवर वळताना त्रास होणे,किंवा पाठीच्या मणक्यातून कूस बदलताना कड कड आवाज येणे,कूस बदलताना पाठीचा मणका एकदम अवघडल्यासारखं होणे,

चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे, कंबरेच्या मागील बाजूने पायाच्या तळव्यापर्यत्न शीर दुखणे,मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे,पायाच्या पंजाची ताकद कमी होणे, पायातील स्पर्शज्ञान कमी होणे,

शौचाला बसता न येणे,चक्कर येणे,नसांवरील असह्य़ दबावामुळे लघवीचे नियंत्रण जाणे, असे काही भयप्रद परिणामही प्रसंगी दिसून येऊ शकतात.

मणक्याचे आजार झाल्यास पाळावयाचे पथ्य

वांगे, बटाटा, हरबऱ्याची डाळ, वाटाणे, चवळी, वाल, अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत.

अति परिश्रमाची कामे टाळावीत, जड वजनाच्या वस्तू उचलू नये.

जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा.

आरोग्य संदर्भात अशीच अशीच खात्रीशीर माहिती पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top