खरतर ताप हा “आजार’ नाही, तर ते केवळ आजाराचे एक लक्षण आहे. बहुतेक आजारांमध्ये कमी-जास्त प्रमाणात ताप येतच असतो. तापामध्ये सगळ्याच शारीरिक व्यवहारांवर बंधन येत असल्यामुळे “काहीही करून प्रथम ताप कमी करा’ असा आपण विचार करत असतो. चला तर जाणुन घेउयात.fever remedy
Table of Contents
जाणुन घेउयात घरगुती उपाय – fever remedy
1) तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो.
2) तुळस घालून केलेला चहा प्यायल्यानेही ताप लवकर उतरतो.
3) ताप आल्यावर जीभ पांढरी होऊन आपल्याला भूक लागत नाही. अश्या वेळी मध घालून तुळशीच्या पानांचा अर्धा चमचा रस सकाळ संध्याकाळ घ्यावा. याने तोंडाला चव येईल आणि भूक लागेल.
4) पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो.
5) खुप ताप असल्यास कपाळावर मिठाच्या पानाच्या किंवा थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्या, हात पायाला कांद्याचा रस चोळावा. ह्या उपायाने ताप बरा होण्यास मदत होते. तरीही ताप कमी न झाल्यास थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे.
6) आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जाईल.
7) थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो.
8) जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुक़डा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो.
9) कांद्याचा रस घेतल्याने जुनाट ताप देखील कमी होतो.
10) बेलफळाचं चूर्ण उपयुक्त ठरतं. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून ताप उतरेपर्यंत घ्यावं
11) शरीरातील पाण्याची पातळी (हायड्रेशन) चांगली राहील याकडे लक्ष पुरवावे. अधूनमधून थोडे थोडे पाणी पीत राहावे.
महत्वाची सूचना
काही घरगुती उपचार सांगितले आहेत त्यामुळे जर आपला ताप कमी नाही होत असेल तर आपल्याला लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे.
आरोग्य संदर्भात अशीच अशीच खात्रीशीर माहिती पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा