Fennel Seeds In Marathi || बडिशेप || बडीशेप खाण्याचे फायदे || बडीशेप अर्क||
Table of Contents
Fennel Seeds In Marathi – उत्तम औषध…
रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते.
Fennel Seeds In Marathi- पोटात गॅस…
होऊ देत नाही व चिकटपणा/आमांश दूर करते.
Fennel Seeds In Marathi – अपचनाच्या सर्व तक्रारींत…
बडिशेप, काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे इ. थोडक्यात, सर्व पचनसंस्थेसाठी उपयोगी आहे. जेवणानंतर एक चमचा बडिशेप रोज दोन वेळा खावी.
मुलांना दात येताना…
जुलाबाचा त्रास होतो, त्यासाठी चुन्याच्या निवळीसह बडीशेप चूर्ण घ्यावे.
भूक लागत नसेल..
तर रोज बडिशेप खावी. त्यासाठी शक्य असेल तर एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे.
स्मरणशक्ती…
सुधारण्यासाठी व बुद्धी तरतरीत ठेवण्यासाठी बडिशेप चूर्ण+ तूप, चाटण द्यावे.
तापामध्ये अंगाची आग होत असेल…
जिभेला शोष पडत असेल तर बडिशेपेचा काढा खडीसाखर घालून प्यायला द्यावा.
मासिक पाळीचे वेळी..
पोटात दुखत असेल, तर त्यासाठी एक चमचा बडिशेप रोज तीन वेळा चावून खावी.
लघवी कमी होत असेल..
तसेच लघवीला जळजळ किंवा आग होत असेल तर एक चमचा बडिशेपेचा काढा करून प्यावा.
उलट्या होत असल्यास…
अर्धा चमचा बडिशेप चूर्ण, एक चमचा मोरावळ्यांत टाकून चाटण करणे.
कोरडा खोकला…
असेल तर, एक चमचा बडिशेप चूर्ण + एक चमचा पत्री खडीसाखर बरोबर घेणे.
सूज व वेदना…
असतील तर बडिशेप, सैंधव पूड व ओवा समभाग घेऊन तव्यावर गरम करून त्यांची रुमालात पुरचुंडी करून शेकावे.
बडीशेप सरबत…
बडिशेप ४ वा ५ चमचे घेऊन ती एका भांड्यात पाणी भरून त्यात टाकून रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे मिश्रण १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात ४ वा ५ चमचे खडीसाखरेचा पाक करून घालावा. म्हणजे चांगले सरबत तयार होते.
उपयोग – या सरबतामुळे भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी होते. शिवाय ते पौष्टिक आहे.
स्वादिष्ट विरेचन चूर्ण…
बडिशेप, ज्येष्ठमध व सोनामुखी प्रत्येकी १५० ग्रॅम एकत्र करून त्यांची पूड करावी. त्यात ३०० ग्रॅम खडीसाखर पूड करून मिसळावी म्हणजे हे विरेचन चूर्ण तयार होते. उपयोग – रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे.
त्याने पोट साफ होते. तसेच मूळव्याध, तोंड येणे इ. उष्णताविकार व त्वचाविकार बरे होतात.
बलदायी पेय
बडिशेप एक चमचा, एका वेलचीचे दाणे व दोन खजुराच्या आठळ्या ( बिया काढाव्यात. ) हे सर्व मिसळून दोन कप पाण्यात रात्री भिजत घालावे. सकाळी मिक्सरमधून काढावे म्हणजे बलदायी पेय तयार होते, ते रोज सकाळी ताकदीसाठी प्यावे.
इतर आरोग्यदायी माहिती पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा