तुळशी – तुळशीचे औषधी उपयोग – तुळशीचे फायदे
Table of Contents
थंडीतल्या त्रासापासून संरक्षण
रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्यावर सर्दी, खोकला, घसा खवखवणे, घसा दुखणे यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
हृदयाचे आरोग्य राखणे
रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो त्यामुळे हृदय नेहमी सुरक्षित राहते.
पोटाच्या समस्या दूर होतील
तुळशी च्या पानांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, पोटाची सूजही कमी होते तसेच अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, आंबट ढेकर यांसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
दुर्गंधीपासून मुक्त होणे
श्वासात दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने नियमित घ्या. यामध्ये आढळणारे गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून श्वासाची दुर्गंधी कमी करतात.
त्वचेचीसाठी फायदेशीर
तुळशीच्या पानांमध्ये आढळणारे अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म त्वचेत खोलवर जाऊन ते स्वच्छ करतात.
आरोग्य संदर्भात अशीच अशीच खात्रीशीर माहिती पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा