uric acid control || युरिक ऍसिड लक्षण || युरिक ऍसिड कमी करण्याचे उपाय ||
यूरिक अॅसिड एक अपशिष्ट पदार्थ आहे जो काही खाद्य पदार्थांमध्ये आढळणाऱ्या प्यूरीन तत्वाच्या तुटण्याने तयार होतो. यूरिक अॅसिड सामान्यपणे रक्तात मिक्स होतं आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा ते जॉइंट्स आणि किडन्यांमध्ये जमा होतं. असं झाल्याने संधीवातासारखी समस्या गाउट आणि किडनी स्टोन होण्याचाही धोका असतो.
Table of Contents
uric acid control
यूरिक अॅसिडवर उपचार करण्यासाठी याच्या लक्षणांना वेळीच ओळखणं गरजेचं आहे. यूरिक अॅसिड वाढल्याची काही लक्षणं तुम्हाला लघवीमध्ये दिसू लागतात. चला जाणून घेऊ यूरिक अॅसिड वाढल्यावर लघवीत काय लक्षणं दिसतात आणि ते कमी करण्यासाठी काय करावं.
युरिक ऍसिड लक्षण
लघवीमध्ये फेस
नॅशनल किडनी फाऊंडेशननुसार, लघवीमधून फेस येणं या गोष्टीचा संकेत आहे की, यूरिक अॅसिडने छोट्या स्टोनचं रूप घेतलं आहे. जर यासोबत तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे.
किडनी स्टोन होणं
यूरिक अॅसिड जेव्हा लघवीसोबत निघत नाही तेव्हा ते क्रिस्टलचं रूप घेतं आणि किडनीमध्ये स्टोन तयार होतात. ज्यामुळे गंभीर वेदना, लघवीतून रक्त आणि पुन्हा लघवीच्या मार्गात इन्फेक्शन होऊ शकतं.
गर्द रंगाची लघवी
गर्द किंवा लाल रंगाची लघवी येणं संकेत आहे की, तुमच्या किडनीमध्ये सगळं काही ठीक सुरू नाही. यातून हे दिसतं की, तुमच्या किडनीमध्ये यूरिक अॅसिडशी संबंधित स्टोन बनत आहे किंवा लघवीसंबंधी समस्याचं एक संभावित लक्षण असू शकतं.
पुन्हा पुन्हा लघवी
काही लोकांना लघवीदरम्यान वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. खासकरून किडनीमध्ये स्टोन किंवा लघवीच्या मार्गात अडथळा असणं. पुन्हा पुन्हा लघवीची ईच्छा हेही एक यूरिक अॅसिडसंबंधी लक्षण असू शकतं.
युरिक ऍसिड कमी करण्याचे उपाय
ही लक्षण दिसल्यावर काय करावे…
जर तुम्हाला यूरिक अॅसिडसंबंधी वरील लक्षण दिसत असतील तर तुम्हाला वेळीच डॉक्टरांकडे जायला हवं. ते यूरिक अॅसिडचं प्रमाण बघण्यासाठी टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात.
- पाणी भरपूर प्यायल्याने… यूरिक अॅसिड पातळ करण्यास मदत मिळते आणि लघवीच्या माध्यमातून ते बाहेर पडतं. दिवसातून कमीत कमी 10-12 ग्लास पाणी प्यावे.
- जास्त प्यूरीन असणारे पदार्थ सेवन करणं बंद करा…जसे की, ऑर्गन मीट, रेड मीट, समुद्री मासे आणि काही भाज्या जसे की, शतावरी व पालक.
- कमी फॅट असलेले डेअरी उत्पादनं जसे की, दूध आणि दही यूरिक अॅसिडचं प्रमाण करण्यासाठी मदत करतात.
- मद्यसेवन खासकरून बीअर आणि स्प्रिट, यूरिक अॅसिड उत्पादन वाढवू शकतात. यांचं सेवन बंद करा.
- हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, जे सामान्यपणे शुगर ड्रिंक्समध्ये आढळतं. यामुळे यूरिक अॅसिड वाढू शकतं.
- लठ्ठपणा हाय यूरिक अॅसिडशी संबंधित आहे. अशात कमी वजन केलं तर यूरिक अॅसिड कमी होण्यास मदत मिळेल.
- चेरी किंवा चेरीचा ज्यूस यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत करतो.
- कडधान्य, फळं आणि भाज्यांसारखे ठोस कार्बोहायड्रेट निवडा. ज्यांनी यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत मिळते.
uric acid control – युरिक ऍसिड वाढल्यास कोणती फळे खावीत
बेकिंग सोडा
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा विरघळवा आणि दोन आठवडे प्या. यूरिक असिडची पातळी कमी होईल.
सफरचंद व्हिनेगर
एका ग्लास पाण्यात दोन चमचे सफरचंद व्हिनेगर मिसळा आणि दिवसातून दोनदा प्या. सलग दोन आठवडे याचा वापर करा.
ओवा
एक चमचा ओवा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. रिकाम्या पोटी प्या. एका आठवड्यात फरक पडेल.
आवळा
आवळ्याचा रस कोरफडच्या रसात मिसळा. परंतु तो घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कच्ची पपई
एक कच्ची पपई कापून 5 मिनिटे 5 लिटर पाण्यात उकळा. हे थंड पाणी नंतर ते 2-3 वेळा प्यावे.
नारळ पाणी
नारळपाणी प्या कारण ते यूरिक असिड रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
भरपूर पाणी यूरिक असिड बाहेर येणे फार महत्वाचे असल्याने भरपूर पाणी प्या. दिवसात थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे.
बथुआ पाणी
बथुआच्या पानांचा रस सकाळी मोकळ्या पोटी प्या. रस घेतल्यानंतर 2 तास काही खाऊ नका. तुम्हाला आठवड्यात फरक दिसेल.
ऑलिव तेल
अन्नात ऑलिव्ह ऑईलचा वापर करा. व्हिटॅमिन ई आणि इतर घटकांनी समृद्ध आहे. जे यूरिक असिड कमी करण्यासाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक औषध आहे.
जवस बी
जेवणाच्या अर्ध्या तासानंतर जवसाचे बी खावे.
काय खावे ?
हिरव्या भाज्या, फळे, अंडी, कॉफी, चहा, ग्रीन टी, संपूर्ण धान्य, ओट्स, तपकिरी तांदूळ ,बार्ली, ड्राय फ्रूट्स खा.
काय खाऊ नये
रात्री दही, मांस-मासे, सोया दूध आणि मसूर आणि तांदूळ खाणे टाळा. खाण्यापिण्याच्या नियमांचे पालन केले तर यूरिक असिड नियंत्रित करता येते.
आरोग्य संदर्भात अशीच अशीच खात्रीशीर माहिती पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा