लिंबूपाणी पिल्यानं बॉडी होते डिटॉक्स, वजन कमी होऊन मेटाबॉलिज्म सुधारते,
बहुतेकदा तुम्ही वजन कमी करण्याच्या हौशी लोकांना लिंबू पाणी पिताना पाहिले असेल. वजन कमी करण्यासाठी बहुतेक डॉक्टर सकाळी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. असे का ?
Table of Contents
लिंबू पाणी पिण्याचे फायदे
लिंबूपाणी पिल्यानं बॉडी होते डिटॉक्स, वजन कमी होऊन मेटाबॉलिज्म सुधारते,
बहुतेकदा तुम्ही वजन कमी करण्याच्या हौशी लोकांना लिंबू पाणी पिताना पाहिले असेल. वजन कमी करण्यासाठी बहुतेक डॉक्टर सकाळी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. असे का ?
लिंबू पाणी पिण्याचे फायदे – बॉडी डिटॉक्स करण्यात उपयुक्त
लिंबामध्ये सामान्य फायबर तसेच पेक्टिन फायबर असते. सामान्य फायबर शरीरातील उपस्थित चरबी काढून टाकण्यासाठी कार्य करते, तर पेक्टिन फायबर शरीराला भूक जाणवू देत नाही. या कारणासाठी, बहुतेक डॉक्टर वजन कमी करण्यासाठी सकाळी पाणी पिण्याचा सल्ला देतात.
सकाळी लिंबू पाणी पिण्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर आपल्याला दिवसभर विनाकारण भूक लागत नाही.
वजन कमी करण्याव्यतिरिक्त लिंबूपाणी इतर अनेक मार्गांनी फायदेशीर आहे.जसे की.
पचनशक्ती सुधारण्यासाठी दररोज सकाळी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळा. चांगल्या चवीसाठी त्यात एक चमचा मध घाला. दिवसभर मध आणि लिंबाचा रस तुम्हाला फ्रेश ठेवतो.
वजन कमी करण्याबरोबरच वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते.
लिंबू पाणी पिण्याचे फायदे – अँटी-ऑक्सिडंटने भरपूर
शरीरास तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी शरीरातून सर्व अनावश्यक घटक काढणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, सकाळी पिलेले लिंबूपाणी शरीरातील सर्व निरुपयोगी घटकांना यूरिनद्वारे बाहेर फेकतात. १ ग्लास कोमट पाण्यात पुदीनाचा रस ५-६ थेंब आणि काळ मीठ टाकून प्या. हे पेय कोलेस्टेरॉलच्या पातळीत समतोल राखण्यासाठी देखील कार्य करते.
शरीरात पाण्याची कमतरता भागविण्यासाठी लिंबाचे पाणी हा एक उत्तम पर्याय आहे.
लिंबू पाणी पिल्याने मेटाबॉलिज्म स्ट्रॉंग होते, जे आपल्यासाठी अन्न पचविणे खूप सोपे करते.
साखरेच्या रूग्णांसाठी हे एक उत्तम पेय आहे, ते पिण्यामुळे त्यांना ऊर्जा मिळते, तसेच साखर पातळी देखील नियंत्रणाखाली असते. एका संशोधनानुसार, खाण्यापूर्वी अर्धा तास आधी लिंबू पाणी पिल्याने शरीराची चरबी १३ टक्क्यांनी कमी होते असे समोर आले आहे.
एका ग्लास कोमट पाण्यात एक चिमूटभर मीठ मिसळल्यास ते प्यायल्याने हिरड्यांचा त्रासही बरा होतो.
येत्या काळात आपल्या शरीरास रोगांपासून वाचवायचे असेल तर आजपासून लिंबाचे सेवन करण्यास सुरवात करा.
इतर आरोग्या विषयी माहिती पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा