डाळिंब खाण्याचे फायदे – Pomegranate Benefits

डाळिंब खाण्याचे फायदे || डाळिंब || Pomegranate Benefits || Pomegranate Juice Benefits ||

डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंब खाण्याचे फायदे काय आहेत जाणून घेऊ.

डाळिंब खाण्याचे फायदे

  1. चिरतारुण्य  टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.2.

    2. अपचन, आम्लपित्त, ताप  या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.

    3. शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.

    4. घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या  सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.5.

    5. यांमध्ये होणाऱ्या श्वेत व रक्त  प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी

    6. मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्त पडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.

    7. ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.

    8. डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.

    9. अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

    10. जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.

    11. डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

     12. बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.

    आरोग्य संदर्भात अशीच अशीच खात्रीशीर माहिती पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

    WhatsApp Group Join Now
    Telegram Group Join Now
    Instagram Group Join Now

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top